adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे संत्रानगरी वरूडमध्ये जल्लोषात स्वागत !

 ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे संत्रानगरी वरूडमध्ये जल्लोषात स्वागत ! फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्...

 ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे संत्रानगरी वरूडमध्ये जल्लोषात स्वागत !

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान; चित्रपटाच्या पोस्टरचे सामूहिक उद्घाटन 


वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी :

(संपादक : हेमकांत गायकवाड)

संत्रानगरी वरूड येथे ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल शनिवार दि.१० ऑक्टोबर रोजी वरूड शहरातील पांढुर्णा चौकातील श्रीकृष्ण प्लाझा येथील हॉटेल क्रेझी डाईन इन याठिकाणी फुले- शाहू- आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा सन्मान करण्यात आला, तसेच चित्रपटाच्या पोस्टरचे सामूहिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरूड येथील प्रसिद्ध पत्रकार तथा नगरसेवक श्री. प्रवीण सावरकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. सुधाकर हरले, तर उद्घाटक म्हणून सौ. दुर्गा हरले उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. संतोष खवले आणि प्रा. प्रवीण बोंद्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ चित्रपटातील मुख्य अभिनेता श्रीवेश देशमुख, सहअभिनेत्री आर्या तभाने, सहअभिनेता सागर वाघमारे, कार्यकारी निर्माता वंश तांदळे आणि अभिनेता महेश वाघमारे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनाने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चित्रपटाचे दिग्दर्शक ॲड. संतोष खवले यांनी उपस्थितांना चित्रपटाच्या संकल्पनेविषयी आणि निर्मितीमागील उद्देशाविषयी सविस्तर माहिती दिली. हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा, तसेच समाजातील प्रत्येक घरापर्यंत त्याचा संदेश पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर चित्रपटातील कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य अभिनेता श्रीवेश देशमुख, अभिनेत्री आर्या तभाने, सहअभिनेता सागर वाघमारे, कार्यकारी निर्माता वंश तांदळे आणि अभिनेता महेश वाघमारे यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. चित्रपटाची निर्मिती करताना घेतलेले परिश्रम आणि या कलाकृतीशी जोडलेल्या आठवणी त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात वरूड तालुक्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक विचारांच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान हा कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग ठरला. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या हस्ते ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या चित्रपटाच्या पोस्टरचे सामूहिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रवीण सावरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. अशा कलाकृतींना प्रेक्षकांचे सहकार्य मिळणे महत्त्वाचे असून, चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक विचार आणि संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चारुशीला नितीन मांडळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी केले. उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि चित्रपटाच्या टीमच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक आणि शुभम हरले दिपांशु माकोडे विशाल ठाकरे अभिजीत धोटे सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

---------------------------------------------

वृत्त विशेष सहयोग

पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 

---------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग 

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments