adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत निवृत्तीनाथ संस्थांच्या अध्यक्षांची हकालपट्टी गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वस्त मंडळाचा एकमुखी निर्णय; प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठवणार

संत निवृत्तीनाथ संस्थांच्या अध्यक्षांची हकालपट्टी गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वस्त मंडळाचा एकमुखी निर्णय; प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण...

संत निवृत्तीनाथ संस्थांच्या अध्यक्षांची हकालपट्टी

गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वस्त मंडळाचा एकमुखी निर्णय; प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठवणार



प्रतिनिधी-जयवंत हागोटे त्रंबकेश्वर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


त्रंबकेश्वर : श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त राहुल साईनाथ साळुंखे यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात महिलेचे अपहरण करून लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत विश्वस्त मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत राहुल साळुंखे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

विश्वस्त मंडळाच्या या निर्णयानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी संबंधित ठरावाचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता धर्मादाय विभागाकडून या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे धार्मिक संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणि संस्थेची प्रतिमा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

No comments