adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सर्वज्ञ विद्यालय, बोरगाव येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

सर्वज्ञ विद्यालय, बोरगाव येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विकास पाटील  (संपादक : हेमकांत गायकवाड) बोरगाव बुद्रुक : स...

सर्वज्ञ विद्यालय, बोरगाव येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न



विकास पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


बोरगाव बुद्रुक : स्पर्श फाउंडेशन, जळगाव संचलित सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव बुद्रुक येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन व वृक्षारोपण करून प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.

     या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक उपकरणे व प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याचा उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला.

    यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, डायटचे प्राचार्य डॉ. झोपे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण डॉ. झोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष दादासो रामकृष्ण मधुकर पाटील, मुख्याध्यापक एस. एच. महानुभाव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments