adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत्रानगरी वरुड शहरात श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

  संत्रानगरी वरुड शहरात श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न  प्रतिभावंतांसह नगरसेवकांचा सन्मान आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्य...

 संत्रानगरी वरुड शहरात श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

 प्रतिभावंतांसह नगरसेवकांचा सन्मान आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्या वतीने नाभिक समाजाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त; मान्यवरांचा गौरव





वरूड (जि.अमरावती) प्रतिनिधी:

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


संत्रानगरी वरूड शहरात नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत नगाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा व प्रतिभावंतांसह नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीने वरुड शहरातील नाभिक समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा तसेच नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील श्री. ज्ञानेश्वरराव डांगरकर होते, तर उद्घाटक म्हणून भाऊरावजी निंभोरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रमेशराव बोरकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर, युवा अध्यक्ष रितेश धानोरकर, डॉ. भारत भारतीय व अनुप जैन यांची उपस्थिती होती.

*आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्याप्रती नाभिक समाजाने व्यक्त केली कृतज्ञता*

वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी वरूड नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी प्रविण सावरकर यांची निवड करून नाभिक समाजाला प्रतिनिधित्वाची संधी दिल्याबद्दल त्यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याने आमदार यावलकर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मुंबईहून परतल्यानंतर समस्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी वरूड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. ईश्वर सलामे यांचा नाभिक समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

*विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव*

कार्यक्रमात वरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, वरूड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश चव्हाण, नगर परिषदेचे सदस्य गौरव इंगळे, डॉ. प्रांजली कुऱ्हाडे, भाजपाचे गटनेते किरण सावरकर, सौ. भारती माळोदे, सौ. ज्योती दुर्गादास शेगेकर, निलेश उर्फ बंटी दुर्गे, नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. कविता उपरकर, नगरसेविका सौ. मनिषा उईके, सभापती सौ. अनिता पराते, नगरसेवक गोपीभाऊ अढाऊ, नितेश धुर्वे, योगेश्वर खासबागे, प्रविण सावरकर, असार बेग, करीम बेग, सभापती विनय खासबागे, सौ. सीमा हरीश कानुगो, सौ. भाग्यश्रीताई अधव, सौ. पुष्पा मुरलीधर पवार आणि सबेरा फाउंडेशनचे डॉ भारत भारती अनुप जैन श्री श्री ज्ञानेश्वर डांगरकर श्री शेषरावजी श्रीराव व पत्रकार निखिल बावणे यांच्यासह उपस्थित मान्यवरांना शाल सन्मान चिन्ह व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

काही नगरसेवक व सदस्य अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. अशा सदस्यांच्या निवासस्थानी जाऊन नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे संचालन राजीव बाभुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रविण सावरकर यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संत नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सोहळ्याला समाजबांधवांची उपस्थिती लाभली.

--------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग*

पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 

--------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments