adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे ३ ऑक्टोबरला कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन

फैजपूर येथे ३ ऑक्टोबरला कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन यावल तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड)  स्वर्गीय कृषिमित्र हरिभाऊ जावळे या...

फैजपूर येथे ३ ऑक्टोबरला कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन



यावल तालुका प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 स्वर्गीय कृषिमित्र हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रावेर–यावल तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी फैजपूर येथील शुभदिव्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ ते ८.३० वाजता कार्यकर्ता उपस्थिती व नोंदणीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० ते ९ वाजता स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन व कार्यकर्ता अभ्यास वर्ग होणार आहे. त्यानंतर स्नेहभोजन व समारोप करण्यात येणार आहे.

या अभ्यास वर्गासाठी राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ता बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी रावेर–यावल तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यकर्ता अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य, पक्षाची भूमिका आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार असून, सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments