चोपडा शहर पोलीस स्टेशन - जनजागृती आवाहन सायबर सुरक्षिततेसाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवा...
चोपडा शहर पोलीस स्टेशन - जनजागृती आवाहन
सायबर सुरक्षिततेसाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
१. बँक पिन, पासवर्ड व ओटीपी गुप्त ठेवा. ही माहिती कोणालाही सांगू नका. बँक कधीही फोनवर पिन किंवा ओटीपी मागत नाही.
२. ओटीपी कोणालाही सांगू नका. मोबाईलवर येणारा ओटीपी हा अत्यंत गोपनीय असतो.
३.अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. मोफत बक्षीस, खाते बंद होणार, KYC अपडेट, परतावा यासारख्या आमिषाच्या बनावट लिंकपासून सावध रहा.
४. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती जपून शेअर करा. मोबाईल नंबर, पत्ता, ओळखपत्र, आर्थिक माहिती सार्वजनिकपणे टाकू नका.
५. अधिकृत अॅप स्टोअरमधूनच अॅप डाउनलोड करा. Google Play Store / Apple App Store चाच वापर करा.
६. अॅपला दिल्या जाणाऱ्या कॅमेरा, संपर्क, लोकेशन परवानग्या तपासा.
७. संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेज किंवा लिंक स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करा.
८. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा आणि सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवा.
९. संदेश: “सावध रहा, सुरक्षित रहा — तुमचा मोबाईल, तुमची सुरक्षा!
१०. डिजिटल व्यवहारात थोडीशी सावधगिरी मोठे आर्थिक नुकसान टाळू शकते.
कोणतीही फसवणूक झाल्यास संपर्क करा - १९३० / १०० / ११२
पो.नि. पवन देसले, चोपडा शहर पोलीस स्टेशन, जळगाव जिल्हा पोलीस

No comments