adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती जि.प. कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे; महिला कार्यकारिणी सदस्यपदी रत्ना कंखरे यांची निवड

कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती जि.प. कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे; महिला...

कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती

जि.प. कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे; महिला कार्यकारिणी सदस्यपदी रत्ना कंखरे यांची निवड


विकास पाटील

(संपादक : हेमकांत गायकवाड)


धरणगाव : कास्ट्राइब संघटनेच्या आगामी राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथे आयोजित कॉर्नर सभेत संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कैलास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनायक बैसाणे, तर महिला कार्यकारिणी सदस्यपदी रत्ना कंखरे यांची निवड करण्यात आली.

     या कॉर्नर सभेत जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बागुल तसेच सल्लागार रमेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

    सभेत दगडू सूर्यवंशी, भूपेंद्र बाविस्कर, किशोर म्हस्के आणि महादू अहिरे यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व सभासदांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

     कैलास पवार यांची कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षकवर्ग, सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments