adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्डी गावात २०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला लागलेली आग ग्रामस्थांच्या तत्परतेने आटोक्यात वर्डी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री पद्माकर नाथ यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला !

  वर्डी गावात २०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला लागलेली आग ग्रामस्थांच्या तत्परतेने आटोक्यात वर्डी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री पद्माकर...

 वर्डी गावात २०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला लागलेली आग ग्रामस्थांच्या तत्परतेने आटोक्यात

वर्डी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री पद्माकर नाथ यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला !



प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


श्री गोपाल रामदास चव्हाण यांच्या गावाजवळच्या शेतातील सुमारे २०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला केळीची वाळलेली पाने जाळत असताना मजुरांकडून अनवधानाने आग लागली. हे वडाचे झाड आतून पोकळ असल्यामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. एखाद्या बॉयलरमध्ये आग भडकल्याप्रमाणे आगीच्या ज्वाळा थेट झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती.

या घटनेची माहिती गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आदरणीय श्री. पद्माकर आबा नाथ यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या दहा मिनिटांत चोपडा येथून अग्निशमन दलाची गाडी बोलावून घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे आग विझविण्याच्या कामाला वेग आला.

झाडाच्या आतील पोकळ भागात आग पसरल्यामुळे ती विझविणे हे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत पद्माकर आबांनी शेतात काम करणारे सहकारी राजू काका कोळी यांना झाडावर चढवून, झाडाच्या वरच्या बाजूकडून खालील पोकळ भागात उच्च दाबाच्या पाण्याच्या गनद्वारे पाणी सोडून आग विझविण्याचे मार्गदर्शन केले. अग्निशमन दलाच्या मदतीने आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान सुरज पाटील, दीपक बडगुजर, तसेच वाघोदेकर रमेश पाटील, पप्पू पाटील, गुलाब चव्हाण, गुलाब पाटील, अर्जुननाना चव्हाण, हिरालाल बा चव्हाण, शरद कोळी, साई शामकांत पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तत्परतेने मदत केली.

सुमारे दोनशे वर्षांपासून आपल्या परिसराच्या साक्षीदार असलेल्या या पुरातन वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी सर्वांनी दाखवलेली एकजूट, धाडस आणि तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.

या संपूर्ण घटनेत प्रसंगावधान राखून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे पोलीस पाटील श्री. पद्माकर नाथ, अग्निशमन दलाचे जवान सूरज पाटील, दीपक बडगुजर, राजू कोळी सहकार्य केले

No comments