adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानात रविवारी कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन कीर्तन, सत्संग भजन आणि दूध अमृताच्या महाप्रसादाचा भाविकांना लाभ; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानात रविवारी कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन कीर्तन, सत्संग भजन आणि दूध अमृताच्या महाप्रसादाचा भाविकांना लाभ; भा...

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानात रविवारी कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

कीर्तन, सत्संग भजन आणि दूध अमृताच्या महाप्रसादाचा भाविकांना लाभ; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन



भामाठाण / प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने व गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर, मु.पो. भामाठाण, ता. श्रीरामपूर येथे रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

कीर्तन, भजन व महाप्रसादाचे आयोजन

उत्सवाच्या निमित्ताने दुपारी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज पारखे (कुरणपूर) यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर श्री. बाबासाहेब गणपत टेमकर (मेंढी, भालगाव (ता. गंगापूर) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत सत्संग भजन होणार असून, रात्री १२ वाजता दूध अमृताचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात येणार आहे.


भाविकांनी दूध व

साखर घेऊन यावे


कोजागिरी पौर्णिमा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी सोबत दूध व साखर घेऊन यावे, अशी सूचना संस्थानाच्या वतीने करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन सद्गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.


गुरुकुल व अन्नदान उपक्रमासाठी सहकार्याचे आवाहन


श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे गुरुकुल व अन्नदान हे उपक्रम सुरू आहेत. संस्थानाच्या विकासकामांसाठी भाविक, दानशूर व्यक्ती व सेवाभावी नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. संस्थानास वस्तुरूपाने किंवा रोख स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांनी संस्थानाशी संपर्क साधावा.

कार्यक्रमाचे ठिकाण : श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर, मु.पो. भामाठाण, ता. श्रीरामपूर.

 संपर्क : स्वामीजी : 9921773005,

संस्थान मॅनेजर : 7588605305

/ 7020902470

भाविकांनी या कोजागिरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच संस्थानाच्या सेवाकार्यात यथाशक्ती योगदान द्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments