महसूल अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईची मागणी; उषाबाई सुकदेव कोळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी (संप...
महसूल अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईची मागणी; उषाबाई सुकदेव कोळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार यावल
तालुका प्रतिनिधी भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शासकीय कर्तव्य पार पाडताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत उषाबाई सुकदेव कोळी यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीनुसार, रायपूर येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या कार्यवाहीदरम्यान कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच शासकीय सेवेशी संबंधित विविध नियमांचा संदर्भ देण्यात आला आहे.
उषाबाई सुकदेव कोळी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फेरफार अर्जाच्या प्रकरणात निर्धारित कालावधीत आवश्यक नोंद घेण्यात आली नाही. तसेच संबंधित कागदपत्रे व कायदेशीर तरतुदींचा योग्य विचार न करता कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3(1) चा संदर्भ देत शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने व शासकीय नियमांनुसार काम करणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी उषाबाई सुकदेव कोळी यांनी केली आहे.
तसेच तक्रारीची प्रत जळगाव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल), फैजपूर आणि तहसीलदार, रावेर यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.
“कायदेशीर आदेश व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा,” अशी मागणी उषाबाई सुकदेव कोळी यांनी केली आहे.
सदर फेरफार प्रकरण सादर करून ४५ दिवस उलटून गेलेले आहेत. तरी या प्रकरणी सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ मधील शासन परिपत्रकानुसार काय कार्यवाही होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

No comments