adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी हा जगाचा पोशिंदा; त्याला दत्तक घेण्याची पात्रता आपली नाही! – ॲड. कल्पना कुळकर्णी फाउंडेशन महाराष्ट्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व सामाजिक लाभ योजनांवर भर

  *शेतकरी हा जगाचा पोशिंदा; त्याला दत्तक घेण्याची पात्रता आपली नाही! – ॲड. कल्पना कुळकर्णी फाउंडेशन महाराष्ट्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संप...

 *शेतकरी हा जगाचा पोशिंदा; त्याला दत्तक घेण्याची पात्रता आपली नाही! – ॲड. कल्पना कुळकर्णी फाउंडेशन महाराष्ट्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व सामाजिक लाभ योजनांवर भर*



*मुर्तिजापूर प्रतिनिधी :* 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, त्याला दत्तक घेण्याची पात्रता कोणत्याही स्वयंसेवी संस्थेत नाही. शेतकऱ्याला स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने शेतीपूरक व्यवसाय व उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन गरुड झेपच्या संचालिका ॲड. कल्पना कुळकर्णी यांनी केले.वॉर फाउंडेशनच्या लाभयोजना ठरणार आधार

वॉर फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा दांदळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून सभासद व त्यांच्या कुटुंबांसाठी विविध सामाजिक लाभयोजना राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

संस्थेच्या यापूर्वीच्या योजनांच्या माहितीनुसार, अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला ₹२१,००० आर्थिक मदत, मुलीच्या जन्मानिमित्त ₹६,००० मदत आणि मुलीच्या विवाहासाठी माहेरचा आहेर म्हणून ₹५,००० चा धनादेश अशा लाभयोजनांचा समावेश आहे. याशिवाय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गरजू घटकांना सामाजिक आधार देणे यावर संस्थेचा भर आहे.

या योजनांचा लाभ संस्थेच्या नियमांनुसार व पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या सभासदांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष दीपकदादा दांदळे पाटील यांनी तळागाळातील महिलांसाठी रोजगार व उद्योग उभारणीच्या संधी निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच संस्थेत वर्षभर ते दीड वर्ष सातत्याने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला आणि पदाधिकाऱ्यांना आजीवन पेन्शन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ॲड. कल्पना कुळकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, लोकमत प्रतिनिधी बाळासाहेब गणोरकर, शिवसेना युवा नेते महेश बगेरे, रामेश्वर हातोलकर, निर्मलाताई कौंडण्यपुर, संजय चव्हाण, प्रवीण खडसे, बुलढाणा जिल्हाप्रमुख अमोल बावस्कार, नागपूर जिल्हाप्रमुख यशवंत शेगर, महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख भागवत वैद्य, हनुमानसिंग चव्हाण, दादासाहेब देशमुख यांच्यासह विविध जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख उपस्थित होते.यावेळी सारिका मिराशे, सौ. टीना देशमुख, राजेंद्र धोटे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संजय गुप्ता, संत गाडगेबाबा स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल तिडके आणि कलाविष्कारचे संस्थापक मिलिंद इंगळे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली.संस्थापक अध्यक्ष दीपकदादा दांदळे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डाहेलकर यांनी केले. प्रास्ताविक प्रल्हाद शेलोरकर यांनी, तर आभार प्रदर्शन महेंद्रसिंग नागोलकर यांनी केले.वॉर फाउंडेशन महाराष्ट्राच्या या उद्घाटन सोहळ्यातून सामाजिक सेवा, महिला सक्षमीकरण आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या संस्थेच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली.

No comments