गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजने कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत यश लियाकत शाह जळगांव [संपादक- हेमकांत गायकवाड] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठ,...
गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजने कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत यश
लियाकत शाह जळगांव
[संपादक- हेमकांत गायकवाड]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठ, लोणेरे अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतर-महाविद्यालयीन कबड्डी आणि खो-खो स्पर्धा १८ ऑक्टोबर रोजी आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत जळगाव येथील गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. महिला कबड्डी संघाने दुसरे स्थान पटकावून रौप्य पदक जिंकले. खो-खो स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कठोर परिश्रमाचे, सांघिक भावनेचे आणि खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.
फोटो कॅप्शन: जळगाव विभागाच्या आंतर-महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेतील महिला गटातील विजेत्या खेळाडूंसोबत क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि इतर उपस्थित.

No comments