फैजपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार व माल्यार्पण करून अभिवादन इदू पिंजारी...
फैजपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार व माल्यार्पण करून अभिवादन
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त फैजपूर शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले आणि त्यांच्या देशाप्रती असलेल्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक अप्पासाहेब चौधरी, माजी नगरसेवक मनोज भाऊ कापडे, नगरसेवक केतन किरंगे, रिपाई जिल्हा अध्यक्ष ईश्वर इंगळे, इंजिनीर विजय तायडे, नितीन कोळी, पप्पू चौधरी, विलास कठोके, विजय मिस्तरी, तुषार भारंबे, मोहित जावळे, भूषण चौधरी, लोकेश कोल्हे,राहुल इंगळे, नीरज झोपे, सोनू सोनवणे, गोलू चौधरी, प्रथम पाचरेवाल तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

No comments