adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अतुल भाऊ पाटील यांची एंट्री; यावल सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज सादर; सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अतुल भाऊ पाटील यांची एंट्री; यावल सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज सादर; सहकार ...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अतुल भाऊ पाटील यांची एंट्री; यावल सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज सादर; सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग


यावल प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर यावल येथील अतुल भाऊ पाटील यांनी यावल सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील, ॲड. देवकांत पाटील, राकेश सोनार, गोलू माळी यांच्यासह विविध पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था आणि सोसायट्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. यावल सोसायटी मतदारसंघातून अतुल भाऊ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अतुल भाऊ पाटील यांच्या उमेदवारीमुळे यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे आणि निवडणुकीच्या हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments