बुऱ्हानपूर येथून गुटखा घेऊन जाणाऱ्या भरधाव कारचा निंभोरा फाटया जवळ भीषण अपघात दोन गंभीर जखमी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक : हेमक...
बुऱ्हानपूर येथून गुटखा घेऊन जाणाऱ्या भरधाव कारचा निंभोरा फाटया जवळ भीषण अपघात दोन गंभीर जखमी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर येथून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा भरून चोपड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारचा निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला या दुर्घटनेत कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आल्याने विवरे परिसरात खळबळ उडाली असून हा प्रकार गुटखा तस्करीचा असल्याने प्राथमिक तपासात समोर आले आहे मिळलेल्या सविस्तर महिती नुसार एमएच २६ व्ही ४४२३ क्रमांकाची चारचाकी गाडी मध्य प्रदेशातील बन्हाणपूर येथून रावेर मार्ग चोपड्याकडे अत्यंत वेगाने जात होती निंभोरा फाट्याजवळ चालकांचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडला अपघाताचा जोरदार आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या दोघांना सुखरुप बाहेर काढले जखमींना तात्काळ सावदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिविल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे अपघात ग्रस्त वाहनांची स्थानिक नागरिकांनी पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेला सुगंधित गुटखा साठवलेला असल्याचे उघडीकीस आले यावरून बुऱ्हाणपूर हुन रावेर मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची वाहतुक केली जात असल्याचा संशय बळावला आहे या घटने मुळे विवरे सह परिसरतील सीमावर्ती भागातून होणाऱ्या गुटखा तस्करीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकारणाची सखोल चौकशी करुन गुटख्याचा मुख्य सुत्रधार आणि या रॅकेटचा पर्दाफाश करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे


No comments