दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे बाळापुर तहसीलदारांना निवेदन तहसीलदार वैभव फरताळे सर यांनी निव...
दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे बाळापुर तहसीलदारांना निवेदन
तहसीलदार वैभव फरताळे सर यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतल्याने दिव्यांग बांधवांनी मानले आभार
बाळापूर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
बाळापूर : दिव्यांग बांधवांचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन (पगार) तात्काळ मिळावे तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार सर्व दिव्यांगांना दरमहा २,५०० रुपये मानधन मिळावे, या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हा अकोला उपाध्यक्ष गणेशभाऊ रमेशराव लहामगे यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बाळापूरचे तहसीलदार मा. वैभव फरताळे सर यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्येची गंभीर दखल घेत निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. तहसीलदार साहेबांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल उपस्थित दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
दिव्यांग बांधवांना गेल्या सात महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने अनेक दिव्यांगांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिव्यांगांना २,२०० रुपये, तर काहींना १,५०० रुपये मानधन मिळत असल्याची बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. सर्व दिव्यांगांना शासनाच्या नियमानुसार पूर्ण मानधन नियमितपणे मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते : प्रहार दिव्यांग क्रांती संस्था जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ रमेशराव लहामगे, प्रहार दिव्यांग शाखा तामसीचे शाखाध्यक्ष विजू मात्रे, शिवसेना शिंदे गट महिला शहर प्रमुख बाळापूर ज्योतीताई थेटे, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना शहर प्रमुख मोहम्मद उस्मान, सहदेव पाथोड, कमलेश पाथोड, सचिन जाधव, सखुबाई काळे, ज्ञानेश्वर वाघ, कैलास सावरे, आयुष उमाळे, फैजल, प्रल्हाद म्हात्रे, प्रभू म्हात्रे इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते


No comments