उमर्टीत झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा पोलिसांचा छापा १२ जण रंगेहात पकडले; तिघे फरार, ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त चोपडा (प्रतिनिध...
उमर्टीत झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा पोलिसांचा छापा
१२ जण रंगेहात पकडले; तिघे फरार, ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
चोपडा (प्रतिनिधी अशोक कोळी)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ५२ पत्त्यांच्या कॅटवर हार-जीतचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले तर अन्य तीन जण पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी या कारवाईत एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत उमर्टी गावात विशाल कालुसिंग पावरा याच्या घराच्या आडोशाला काही इसम झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना छापा टाकण्याचे आदेश दिले
त्यानंतर पोलिसांचे पथक शासकीय वाहनाने उमर्टी येथे रवाना झाले. घटनास्थळी जाण्यापूर्वी दोन पंचांना सोबत घेण्यात आले पोलिसांनी गावातील बसस्थानकाजवळ शासकीय वाहन उभे करून पायी घटनास्थळ गाठले यावेळी विशाल कालुसिंग पावरा याच्या घराच्या आडोशाला काही इसम गोलाकार बसून ५२ पत्त्यांवर झन्ना-मन्ना जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून १२ जणांना जागीच पकडले
पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे विशाल कालुसिंग पावरा (वय ३३) जालंदर तुकाराम भिल (वय ३४) रणधीश रमेश पावरा (वय ४२) राजू गिलदार पावरा (वय ५०)शिवदास रामसिंग पावरा (वय ३८)वासुदेव तुकाराम सांगोरे (वय ४५) हरसिंग भंगा पावरा (वय ४०)रमेश प्रताप पावरा (वय ३२),गोविंद छतरसिंग पावरा (वय २७),अर्जुन धरमसिंग पावरा (वय २४) आबा मेहरबान पावरा (वय ३८),अमोल प्रतापसिंग राजपूत (वय ४२),सर्व आरोपी रा. उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव तीन आरोपी फरार या कारवाईदरम्यान दिलीप भिला पावरा बाजीराव रामचंद्र पावरा आणि अरुणसिंग मुन्नासिंग चौहाण (सर्व रा. उमर्टी) हे तिघे घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे
३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी पंचांसमक्ष पकडण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, १ हजार ५६० रुपये रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा एक कॅट असा एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
चोपडा पोलीस ठाण्याच्या या कारवाईमुळे उमर्टी परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपास चोपडा ग्रामीण करीत आहे.

No comments