अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव यांची सदिच्छा भेट अंतुर्ली किरण धायले (संपादक...
अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव यांची सदिच्छा भेट
अंतुर्ली किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारांविषयी जनजागृती व उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांच्याशी विचार विनिमय करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्हीजे एनटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, भ्रष्टाचार अत्याचार समितीचे सदस्य शेख भैय्या शेख करीम मुंबई शाखा, अकिल शेख औषध निर्माण अधिकारी,पवन बोदडे आरोग्य सेवक, अनिता पेढोर आरोग्य सेविका, दिक्षा सावळे आरोग्य सेविका. अनिल वाडीले यांनी आजच औषधी विषयी विचारणा केली असता जळगाव येथे औषधी आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स गेलेली आहे असे डॉक्टर साहेबांनी सांगितले. साथीच्या आजारावर उपाययोजना करण्यात यावी फॉगिंग मशीन द्वारे धुरळणी करण्यात यावी त्याचप्रमाणे जंतुनाशकाची फवारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

No comments