चंद्रपूर येथे ९ ते १२ जानेवारी दरम्यान २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन ११ जानेवारीला प्रांतीय नारी जागरण संमेलन, तर १२ जानेवारीला प्र...
चंद्रपूर येथे ९ ते १२ जानेवारी दरम्यान २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन
११ जानेवारीला प्रांतीय नारी जागरण संमेलन, तर १२ जानेवारीला प्रांतीय युवा संमेलन; चिन्मय पांड्या यांची विशेष उपस्थिती
चंद्रपूर : (डॉ.अनिलकुमार पालीवाल)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
परमपूज्य गुरुदेव यांच्या विचारांनुसार आणि शांतिकुंज हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल विश्व गायत्री परिवार, चंद्रपूर यांच्या वतीने ९ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘राष्ट्र शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, चंद्रपूर येथे हा भव्य आध्यात्मिक सोहळा आयोजित केला आहे.
नारी जागरण व युवा संमेलन
शांतिकुंज हरिद्वार यांच्या निर्देशानुसार या आयोजनात दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. ११ जानेवारी रोजी प्रांतीय नारी जागरण संमेलन, तर १२ जानेवारी रोजी प्रांतीय युवा संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही संमेलनांना आदरणीय श्री चिन्मय पांड्या यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
ऑनलाईन नोंदणी
या ऐतिहासिक आध्यात्मिक आयोजनात महाराष्ट्र प्रांतातील सर्व गायत्री परिजनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व परिजनांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणीची माहिती आपापल्या जिल्हा समन्वयक व झोन प्रभारी यांनाही द्यावी, असे कळविण्यात आले आहे.
समयदानी कार्यकर्त्यांना आवाहन
प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे किंवा अन्य वाहतूक सुविधांचे येण्या-जाण्याचे आरक्षण आतापासूनच निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महायज्ञाच्या विविध व्यवस्थांमध्ये वेळदान व श्रमदान करू इच्छिणाऱ्या परिजनांनी चंद्रपूर येथे येण्याची तारीख आणि कालावधी आयोजन समितीला कळवावा. त्यामुळे निवास, भोजन व अन्य व्यवस्थांचे नियोजन सुलभ होणार आहे.
उपस्थितीचे आवाहन
या महत्त्वपूर्ण आयोजनाची माहिती महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, झोन तसेच गायत्री परिवाराच्या विविध व्हॉट्सॲप समूहांमध्ये व्यापक स्वरूपात प्रसारित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ऑनलाइन नोंदणी व अधिकृत माहितीसाठी संकेतस्थळ : https://gpchandrapur.org आपला वेळ, श्रम, साधना आणि सहकार्य अर्पण करून या ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व गायत्री परिजनांनी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजन समिती, श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments