adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लावणीचा रंगबहार' चे थाटात प्रकाशन; उत्तम कांबळे यांनी उलगडला लावणीचा १२ व्या शतकापासूनचा इतिहास...

लावणीचा रंगबहार' चे थाटात प्रकाशन; उत्तम कांबळे यांनी उलगडला लावणीचा १२ व्या शतकापासूनचा इतिहास... नाशिक प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत ...

लावणीचा रंगबहार' चे थाटात प्रकाशन; उत्तम कांबळे यांनी उलगडला लावणीचा १२ व्या शतकापासूनचा इतिहास...



नाशिक प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

लावणीकार रविकांत शार्दूल यांच्या *'लावणीचा रंगबहार'* या लावणी संग्रहाचे प्रकाशन काल, शनिवार दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय सभागृहात, ज्येष्ठ साहित्यिक *मा. उत्तम कांबळे* यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी कांबळे साहेब यांनी माझी मैना गावाकड राहिली,

माझ्या जीवाची होतीया काहीली.

ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी अण्णाभाऊ साठे यांनी कुठल्याही बाईसाठी नाही तर कर्नाटक आमचा प्राण आहे आणि तो आमच्यापासून वेगळा होतोय अशी क्रांतीसाठीची छक्कड सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

लावणीने स्त्रियांच्या संपूर्ण सौंदर्याचे वर्णन केले परंतु त्याच्यापलीकडे जाऊन त्या स्री च्या वेदनेचा कुणी विचार करून लावणी लिहिली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना उत्तम कांबळे यांनी १२ व्या शतकापासूनचा लावणी या गीत प्रकाराचा व नृत्य कलेचा इतिहास उलगडून सांगितला. शृंगारिक लावणी, आध्यात्मिक,सामाजिक लावणी प्रकार सांगून लावणीचे बदलते स्वरूप, बदलते रूप आणि तिचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व यावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

 मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उत्तम कांबळे, लेखक रविकांत शार्दूल, सौ. रजनी शार्दूल, सिद्धय्या स्वामी सर, उप अभियंता राहुल किवंडे, सेवानिवृत्त एच. आर. उल्हास आहेर आणि साहित्यिका अलका कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिका सौ. अलका कुलकर्णी यांनी केले. यावेळी सौ. शुभांगी पाटील, अशोक कुमावत व रविकांत शार्दूल यांनी बहारदार लावणी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना संगीत साथ रतन हिरे व प्रेम नागरे यांनी दिली.

समारंभाला नातेवाईक, मित्रमंडळी व नाशिक कवी कुळातील अनेक साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे लेखकांच्या आई *शांताबाई शार्दूल* यांची विशेष उपस्थिती होती.त्यांच्यासाठी कुमावत यांनी तुझा हात परीस,माझा लोखंडी ग झुला ही भावनिक, हळवी कविता गाऊन उपस्थिनाच्या मनात आईविषयीचे महत्त्व जागे करून सर्वांची मने जिंकली.यावेळी आईचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी वाचनालयाचे सचिव राजू नाईक, विश्वस्त राजू देसले, डॉ. विशाल जाधव, सामाजिक व कामगार नेते करुणासागर पगारे दादा, काशिनाथ वेलदोडे, रवींद्र पगारे सर, रवींद्र मालुंजकर, बाळासाहेब गिरी, किरण सोनार, डॉ. प्रशांत आंब्रे, निशांत गुरू, सुभाष सबनीस, बहिरु गामणे, अरुण घोडेराव,तुकाराम ढिकले,अरुण इंगळे असा साहित्यिक परिवार आणि स्नेही सुभाष गांगुर्डे रंगकर्मी पुष्पेंद्र जाधव, शशिकांत शार्दूल, स्वप्ना शार्दूल आप्तेष्ट नातेवाईक आदी जवळपास शंभरच्या वर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास नलावडे, ललिता खुटे, रंजन कापडणीस, बहिरु गामणे यांनी विशेष प्रयत्न केले. आभार साहित्यिक मधुकर गिरी यांनी मानले. या संपूर्ण सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांनी केले.

No comments