adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी! – आमदार नंदकिशोर महाजन बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन; रावेर येथे पत्रकार परिषदेत विविध उपक्रमांची घोषणा

आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी! – आमदार नंदकिशोर महाजन बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ११ ते १८...

आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी! – आमदार नंदकिशोर महाजन

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन; रावेर येथे पत्रकार परिषदेत विविध उपक्रमांची घोषणा


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. एकही पात्र आदिवासी बांधव शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात 'जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी रावेर पंचायत समिती सभागृहात आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महाजन यांनी सप्ताहांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

पत्रकार परिषदेला तहसीलदार संजय तायडे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, नगरसेविका सीमा जमादार, कलिंदर तडवी, सहायक गटविकास अधिकारी के. पी. वानखेडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सप्ताहात विविध जनहितकारी उपक्रम

जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लिअस बजेट योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप, १४ नोव्हेंबर रोजी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव, १६ नोव्हेंबर रोजी आधारकार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी विशेष सेवा शिबिर, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषणविषयक जनजागृती शिबिर, तर १८ नोव्हेंबर रोजी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण कार्यक्रम घेऊन सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, शासकीय सेवांचा लाभ आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी जनजागृती केली जाणार आहे.

योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार नंदकिशोर महाजन यांनी यावेळी केले.

No comments