adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा जळगावात इतिहास घडणार १ लाख पुस्तकांमधून प्रत्येक वाचकाला मोफत पुस्तक मिळणार!

वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा जळगावात इतिहास घडणार   १ लाख पुस्तकांमधून प्रत्येक वाचकाला मोफत पुस्तक मिळणार!      इदू पिंजारी फैजपूर  (संपा...

वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा जळगावात इतिहास घडणार  

१ लाख पुस्तकांमधून प्रत्येक वाचकाला मोफत पुस्तक मिळणार!     


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


जळगाव - येथील व. वा. जिल्हा वाचनालय आणि डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यामाने उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे बुक स्ट्रीट उपक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

          काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते दुपारी ११ या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

             या उपक्रमात मिश्र स्वरूपातील व विविध भाषेतील सुमारे एक लाख पुस्तकांची रस्त्यावर मांडणी करण्यात येणार असून तेथे भेट देणाऱ्या प्रत्येक वाचकाला एक पुस्तक मोफत मिळणार आहे.    

  डोंबिवली,पुणे, ठाणे यानंतर जळगावात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने व. वा. जिल्हा वाचनालयाच्या १५० वर्षानिमित्त या बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.

     या उपक्रमास शहर महानगरपालिका, पोलीस विभाग व शहर वाहतूक विभागाचे सहकार्य लाभत आहे. पत्रकार परिषदेला पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवलीचे अमेय घेसास, हेमंतकुमार नेहेते, संकेत पै, सिद्धार्थ सामंत, वाचनालयाच्या सचिव प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, महिला समिती प्रमुख संगीता अट्रॉवलकर, ग्रंथपाल अनिल अत्रे यांची उपस्थिती होती.

     संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि इतिहास घडवावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments