adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संविधानच्या दिवशी एकता संघटनने घेतली उपोषणकर्त्यांची भेट

  संविधानच्या दिवशी एकता संघटनने घेतली उपोषणकर्त्यांची भेट लियाकत शाह जळगांव (संपादक :- हेमकांत गायकवाड) अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि आ...

 संविधानच्या दिवशी एकता संघटनने घेतली उपोषणकर्त्यांची भेट


लियाकत शाह जळगांव

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच संविधानाने दिलेल्या अधिकारांची खरी जपणूक आहे, या भूमिकेतून संविधान दिनाचे औचित्य साधत एकता संघटना, जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

१६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या उपोषणात रोहित भालचंद्र पाटील, आनंद सखाराम पाटिल आणि संजय भिका महाजन यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाशी संबंधित प्रश्न, शिक्षण विभागा सह कथित अन्याय व अत्याचार, तसेच संबंधित पोलीस यंत्रणेकडून योग्य कारवाई न झाल्याच्या तक्रारींचा समावेश आहे.

एकता संघटनेच्या प्रतिनिधींनी उपोषणस्थळी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेतल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांच्याशीही फारूक शेख यानी फोनद्वारे संपर्क साधून या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

उपोषणकर्त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. पालकमंत्र्यांनी या विषयाची दखल घेण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले.

फोटो कॅप्शन : जळगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देताना एकता संघटनचे पदाधिकारी.

No comments