जाहीरातींसाठी पत्रकार हवेत, पण पत्रकारांना मदतीची वेळ आली की दुष्काळाची सबब ! वर्षभर प्रसिद्धीचा लाभ घेणान्यांचे दिवाळीत हात आखडते; ग्रामीण...
जाहीरातींसाठी पत्रकार हवेत, पण पत्रकारांना मदतीची वेळ आली की दुष्काळाची सबब !
वर्षभर प्रसिद्धीचा लाभ घेणान्यांचे दिवाळीत हात आखडते; ग्रामीण पत्रकारितेच्या आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर !
लातूर, जि. प्र. (उत्तम माने, 8484878818)
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यंदा निसगींच्या लहरीपणाने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतींचे मोठे नुकसान झाले असून शेतकन्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मात्र, या संकटांच्या काळात ग्रामीण पत्रकारितेवरही जाहिरातींचा दुष्काळ पडल्याचे चित्र समोर येत आहे.
प्रसिद्धी हवी तेव्हा पत्रकारांची आठवण, जाहिरात मागितली की दुष्काळांची आठवण !
गावागावातील समस्या, शेतकन्यांच्या व्यथा, सामाजिक उपक्रम, कार्यक्रम, उद्याटने, सत्कार समारंभ आणि शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी ग्रामीण पत्रकार वर्षभर धडपडत असतात. मात्र, दिवाळीत जाहिरात मागितली की परिस्थिती बदलते.
पत्रकारांची लेखणी मोफत प्रसिद्धीसाठीच आहे का?
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पण ही जबाबदारी पार पाडणान्या ग्रामीण पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी समाजाकडून कितपत पाठबळ दिले जाते, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
दुष्काळ शेतातच नाही, पत्रकारांच्या उंबरठ्यावरही !
प्रवासखर्च, इंटरनेट, वृत्तसंकलन, छायाचित्रण आदी कामांसाठी पत्रकारांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. अशा परिस्थितील दिवाळीच्या काळात जाहिरातींचे आर्थिक पाठबळ मिळाले, तर त्यांच्या कामाला निश्शिात्तच आधार मिळू शकतो.
शेवटी एकच सवाल : पत्रकारांची लेखणी प्रसिद्धीसाठी हवी, मग त्यांच्या अस्तित्वासाठी जाहिरातींचे पाठबळ नको का?
पत्रकारितेच्या श्रमांचा सन्मान करुन स्थानिक वृत्तपत्रांना जाहिरातींच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका सींनी घ्यावी.
कारण पत्रकारांची लेखणी थांबली, तर अनेकांचा आवाजही समाजापर्यत पोहोचणे कठीण होईल !

No comments