काकर समाजाचे राष्ट्रीय महासचिव आरिफ बापू काकर यांचा श्रीरामपूरात भव्य सत्कार श्रीरामपूर / प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) ऑल इंडिया मुस...
काकर समाजाचे राष्ट्रीय महासचिव आरिफ बापू काकर यांचा श्रीरामपूरात भव्य सत्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया मुस्लिम काकर समाजाचे राष्ट्रीय महासचिव, तसेच गुजरात काकर समाजाचे प्रभारी व संस्थापक सचिव मा. काकर आरिफ बापू यांचे श्रीरामपूर येथे आगमन झाले असता त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
काकर समाजाच्या संघटनात्मक कार्यात आरिफ बापू यांचे मोठे योगदान आहे. ऑल इंडिया काकर चे राष्ट्रीय अध्यक्ष, धार (मध्य प्रदेश) येथील ॲड. काकर हाजी अब्दुर्रऊफ आणि महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष निजामभाई काकर यांच्या सोबत त्यांनी समाज बांधणीचे मोठे कार्य केले आहे. तसेच गुजरात काकर समाजाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
१५ जानेवारी २०१७ रोजी श्रीरामपूर येथे झालेल्या काकर समाजाच्या राष्ट्रीय मेळावा व 'हयाते काकर' पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आरिफ बापू यांनी विशेष पुढाकार घेतला होता. काकर समाजात तसेच गुजरात राज्यात एक सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून आरिफ बापू यांच्याकडे पाहिले जाते.
नुकताच श्रीरामपूर येथे काकर समाज,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, भारतीय लहुजी सेना तथा काकर बिरादरी तर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऑर्गनायझेशनचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी फैय्याज भाई बागवान, प्रदेश सल्लागार डॉ. सलीम भाई शेख, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय महासचिव हनीफ भाई पठाण, उद्योजक अन्सार तांबोळी, काकर समाजाचे राष्ट्रीय संघटक व जिल्हाध्यक्ष इकबाल इस्माईल काकर यांच्या आदी उपस्थित होते.
यासोबतच काकर समाजाचे महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष तथा वैजापूरचे माजी नगरसेवक हाजी बिलाल हुसेन काकर यांनी आरिफ बापू यांच्या महाराष्ट्र राज्य दौऱ्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments