adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवघ्या दोन दिवसांत मागणी पूर्ण! वर्षाताई चोपडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) गटनेत्या वर्षाताई चोपडे यांच्या निवेदनाची एसटी महामंडळाकडून तातडीने दखल; यावल-पुणे मार्गावर जादा बसेस व रातराणी बससेवा सुरू!

  अवघ्या दोन दिवसांत मागणी पूर्ण! वर्षाताई चोपडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) गटनेत्या वर्ष...

 अवघ्या दोन दिवसांत मागणी पूर्ण! वर्षाताई चोपडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) गटनेत्या वर्षाताई चोपडे यांच्या निवेदनाची एसटी महामंडळाकडून तातडीने दखल; यावल-पुणे मार्गावर जादा बसेस व रातराणी बससेवा सुरू!


यावल तालुका प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

यावल शहर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच पुणे येथे नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या प्रवाशांची दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी गैरसोय लक्षात घेऊन यावल नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गटाच्या) गटनेत्या सौ. वर्षा निरज (आकाश) चोपडे यांनी दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यावल आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदन देऊन यावल ते पुणे व पुणे ते यावल मार्गावर जादा बसेस तसेच रातराणी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

या निवेदनाला महायुतीच्या नगरसेवकांनी सहकार्य करत प्रवाशांच्या प्रश्नांसाठी एकजूट दाखवली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका सविताताई नन्नवरे, कल्पना वाणी, शुभांगी येवले, उमेश भेगडे, बाळू फेगडे, कादिर खान, इरफान लाल आणि रुबाब तडवी उपस्थित होते. सर्वांनी वर्षाताई चोपडे यांच्या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाकडे जादा बससेवा सुरू करण्याची मागणी केली.

या निवेदनाची एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने दखल घेत अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मागणी पूर्ण करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

दिवाळी सणानिमित्त पुणे येथे राहणारे यावल शहर व तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने आपल्या गावी ये-जा करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त बसफेऱ्या आणि रातराणी बससेवा सुरू करण्याची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन वर्षाताई चोपडे यांनी पुढाकार घेत महायुतीच्या नगरसेवकांच्या सहकार्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनावर अवघ्या ४८ तासांच्या आत सकारात्मक निर्णय झाल्यामुळे वर्षाताई चोपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.

या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे यावल आगार व्यवस्थापक व संबंधित प्रशासनाचे वर्षाताई चोपडे यांनी आभार व्यक्त केले.

पक्षीय समन्वयातून महायुतीच्या नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन केलेले सहकार्य हे लोकहिताच्या कार्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार, महायुतीचे सहकार्य आणि अवघ्या दोन दिवसांत मागणी पूर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

No comments