प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीचे 28 दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषन सुरूच मागणी पूर्ण होऊ ...
प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीचे 28 दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषन सुरूच मागणी पूर्ण होऊ पर्यंत उपोषण चालूच राहणार उपोषणकर्त्याची ठाम भूमिका
*उपोषण कर्ते गणेश इंगळे व सहकारी यांची तब्येत खालवल्याने ते दवाखान्यातून उपचार घेऊन पुन्हा न्याय मिळण्यासाठी उपोषणात हजर*
बुलडाणा विभाग प्रमुख : अमोल बावस्कार
*बुलढाणा:-* 2 जानेवारी पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू असलेल्या बेरार प्रांतातील अमरावती महसुल विभागामधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.तसेच अमरावती विभागातील बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी हे विमुक्त जाती अ VJ-A मध्ये येतात तरी पण नाम सदृष्याचा फायदा घेऊन त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविलेले आहे. ते अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्य करुन जप्त करण्यात यावे.सदर मागणी करीता (एल्गार अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज 28 वा दिवस असून मागील 3 दिवसापूर्वी उपोषण करत असलेले गणेश इंगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दवाखान्यात उपचार करिता हलविण्यात आले सदर उपचार घेऊन जमातीच्या न्याय हक्कासाठी पुन्हा उपोषण स्थळी हजर झाले मागील 23 जानेवारी रोजी प्रशासनाने जात प्रमाणपत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी दिला होता आता प्रशासनानने दिलेला शब्द पाडणार की काय यावर आदिवासी कोळी महादेव जमात बांधव ठाम असून आता जर जमातीची दिशाभूल केल्यास आदिवासी कोळी महादेव जमातीचे रूद्र रूप महाराष्ट्र भर पहावयास मिळेल याविषयाकडे शासन प्रशासनाने लक्ष द्यावे..
No comments