Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड

  गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड गट शिक्षणधिकारी जाधव यांनी दिले वसुली चे आदेश... संपादक ...

 गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांकडून


लाखो रुपयांचा घोटाळा, भाऊसाहेब शिंदे नी केला उघड


गट शिक्षणधिकारी जाधव यांनी दिले वसुली चे आदेश...


संपादक : हेमकांत गायकवाड 


नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील भाऊसाहेब रामदास शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी शासन परिपत्रक ९ सप्टेंबर २०१९ च्या निर्णया नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र, गुंडेगाव येथील कार्यरत असलेले मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी राहत नसले बाबत ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ठराव घेऊन घरभाडे भत्ता घेणे आवश्यक असताना सन २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३ या कालावधीत नियमबाह्य घरभाडे भत्ता घेतल्याची तक्रार केलेली होती. ग्रामसभा ठराव न देताच घरभाडे घेतले असून ते वसूल करण्यात यावे अशी मागणी केली होती.

    भाऊसाहेब रामदास शिंदे,यांनी गुंडेगांव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक  असे एकूण २४ कर्मचारी  मुख्यालयी न रहाता शासनाची फसवणूक करुन घेत असलेले घरभाडे तात्काळ बंद करावेत तसेच यापूर्वीचे घेतलेले घरभाडे वसूल करण्यात यावे.सर्व शिक्षक व मुख्याध्यापक हे मुख्यालयी रहात असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक असताना ग्राम सभेचा ठराव न घेताच घरभाडे घेतले असून ते वसूल करण्यात यावे. तसेच शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे सन २०१८ ते २०२३ पर्यंतचे कॉल डिटेल लोकेशन काढावेत गुंडेगांव केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयात राहात असलेल्या घराच्या पत्याजवळील लोकांकडून माहिती घेणे व शासनाची फसवणूक केलेल्या शिक्षकांवर व मुख्याध्यापकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावेत अन्यथा  २९/०१/२०२४ पासून श्रीराम व्यासपीठ गुंडेगाव येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते.याबबत शिक्षक व मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून खुलासा विचारणा करण्यात आलेली होता.यानुसार दिनांक २७/०१/२०२४ रोजी चा खुलासा सादर केलेला होता सदरचे खुलासे संयुक्तिक नसल्याने तसेच शासन निर्णय दिनांक ९ सप्टेंबर २०१९ चे उल्लघंन झाल्याने अमान्य करण्यात आलेले आहेत.ज्याअर्थी सदर कालावधीत ग्रामसभा झालेले पुरावे तक्रारदार यांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच तक्रारदार भाऊसाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांनी घरभाडे भत्ता वसुली बाबत व प्रशासकीय कारवाई करणे बाबत मागणी केली असता रक्कम रु.३६,६४,९८०/- वसुलीची कारवाई करण्यात आली आहे..


चौकट..


बाबुराव जाधव,

गट शिक्षण,अधिकारी,पंचायत समिती,अहमदनगर.


गुंडेगाव केंद्रातील प्राथमिक शाळा येथील शिक्षकांवर घरभाडे भत्ता वसुलीची कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून केली जाईल.सदर पुरावे लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.

No comments