चोपडा : महेश शिरसाठ *महावीर नगरात ॐसिध्देश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे* .. *विलोभनीय सजीव देखावा मिरवणूकीने राम लल्ल...
चोपडा : महेश शिरसाठ
*महावीर नगरात ॐसिध्देश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे* .. *विलोभनीय सजीव देखावा मिरवणूकीने राम लल्लाचे झाले दर्शन*
*चोपडा दि.२४(प्रतिनिधी ):* अयोध्या येथे श्री रामचंद्र भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा होत आहे त्यानिमित्त चोपडा येथील ओम सिद्धेश्वर महादेव मंदिर समितीतर्फे जल्लोषपूर्ण वातावरणात फटाकांच्या आतिश बाधित सवाद्य संजीव देखाव्यासह जय श्रीराम, जय जय श्रीराम घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात येऊन विविध कार्यक्रम साजरे करण्यात आली.
मिरवणुकीच्या प्रारंभी ओम सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रीरामाच्या प्रतिमा देऊन पूजन होऊन आरती करण्यात आली त्यानंतर सजवलेल्या रथावर श्रीरामाचे पात्र असलेला कु.कृष्णा संदीप सावळे, सीतेचे पात्र केलेल्या कु. देवांशी योगेश मराठे, लक्ष्मणाचे पात्र केलेल्या कु.शिवांश रोहित सोनार व हनुमंताचे पात्र गेलेला कु.व्यंकटेश भूषण मराठे आणि शबरीचे पात्र केलेली इशिता महेश शिरसाट यांचे जमीनीवर पुष्पगुच्छ पसरत रथावर विराजमान करण्यात येऊन संवाद्य मिरवणूक महावीर परिसरात काढण्यात आली.
यासाठी महिला व युवतींनी आप आपल्या घरासमोर रांगोळी काढून सजावट केली होती शिवाय महाप्रसादात दोन हजार केळी वाटप करण्यात आली सायंकाळी दीपोत्सव तर रात्री छोटेखानी भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली .
यावेळी कार्यक्रम प्रमुख पत्रकार महेश शिरसाठ ,संदीप सावळे, अनिल बडगुजर ,रोहित सोनार, सुमित सोनार, सोपान मराठे, योगेश मराठे, रतिलाल बडगुजर, अशोक बडगुजर, गणेश सोनार,सुरेश पाठक, देवांग सर,मोतीराम महाजन, भारत राजपूत, पियुष चव्हाण,गोपाल मराठे, श्याम बडगुजर,दिनेश मासरे ,, रणछोड लोहार,वसंत बडगुजर, अनिरुद्ध लोहार,डॉ रविंद्र बडगुजर,भैया साळवे, शुभम साळुंखे ,साहेबराव महाजन, भावेश सोनवणे, आकाश बडगुजर ,आकाश महाजन, पुनमचंद भावसार, , जेठाराम तांबाराम चौधरी यासह महिला ,तरुणी,व बालगोपाळांची खास उपस्थिती होती.
No comments