भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठ कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसाद संपादक: हेमकांत गायकवाड चोपडा शहरातील रामपुरा भागातील भगवान श...
भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठ कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसाद
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा
शहरातील रामपुरा भागातील भगवान श्रीराम मंदिर येथे २२ जानेवारी ला सकाळी महाअभिषेक करण्यात आल,दुपारी जोड महादेव मंदिर पासून श्रीराम मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली आणि महाप्रसाद ठेवण्यात आला होता.संध्याकाळी राम भक्तांनी भजनांचा आनंद घेतला दिपोत्सव साजरा करण्यात आला व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली,आरती संपन्न झाल्यानंतर तरुणांनी जल्लोष साजरा केला.यावेळी शिवदास सोनवणे,यमुना सोनवणे,मंदिराचे पुजारी देवानंद वैद्य,मनीषा वैद्य उपस्थित होते.अभाविप शहरमंत्री हर्षल जगताप,तालुका संयोजक हर्षल पाटील,साक्षी गुजराथी,उज्जैनी पाटील,भक्ती वैद्य यांनी सहकार्य केले.मृणाल वैद्य,मुकेश बडगुजर,कुणाल कोळी,अनिकेत पारधी,गणेश पारधी,अविनाश राजपूत इत्यादी कार्यकर्ते रोहिदास पारधी,संदीप राजपूत तसेच रामपूरा विभागातील सर्व हिंदू बांधवांनी कार्यक्रमाला सहकार्य करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र पाटील,पवन वाघ उपस्थित होते.

No comments