बुलढाणा विभाग प्रमुख : अमोल बावस्कार मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील अमर दुध डेअरी केंद्राची व तेथील दुध तसेच दुधापासून बनविण्यात येणार्य...
बुलढाणा विभाग प्रमुख: अमोल बावस्कार मलकापूर
बुलढाणा जिल्ह्यातील अमर दुध डेअरी केंद्राची व तेथील दुध तसेच दुधापासून बनविण्यात येणार्या पदार्थांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २९ जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत् काही वर्षामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह खांदेश भागात व इतरत्रही अमर दुध डेअरीने आपले जाळे विणले असून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी आपली केंद्रे उघडली आहेत. अमर दुध डेअरीच्या माध्यमातून दुध, दही, ताक, पेढा, तुप तसेच दुधापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ याठिकाणावरून मोठ्या प्रमाणात विक्री केले जातात. मात्र खरोखर एवढ्या मोठ्या प्रमाणात दुध संकलन होते का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अमर दुध डेअरीच्या माध्यमातून विक्री होणारे पदार्थ खरोखरच दुधाचे की अन्य काही? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तेव्हा बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या अमर डेअरीच्या सर्व केंद्रांची तपासणी होणे त्याचबरोबर त्या केंद्रामध्ये संकलीत होणारे दुध तसेच त्याठिकाणावरून विक्री होणार्या दुधाच्या पदार्थांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी अजय टप यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रतिलिपी त्यांनी मुख्यमंत्री
![]() |
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप |
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजिदादा पवार, आ.बच्चुभाऊ कडू यांचेसह आदींना दिल्या आहेत.
No comments