जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी तर एम.राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली ( जळगाव जिल्हा पोलिस अधि...
जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी तर एम.राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली
![]() |
( जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षकपदी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी ) |
जळगाव प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
जळगाव जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्या बदल्या झाल्यात त्या पाठोपाठ आज जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांची बदली देखील झाली असून त्यांच्या जागी एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी येत आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जळगावचे पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांची बदली झाली आहे.एम.राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी येत आहेत.महाराष्ट्र शासनाचे मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी तसे आदेश काढण्यात आलेले आहेत.
No comments