वेअर हाऊस बाधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक सोनवणे यांनी साडेसात हजार रुपयाची मागितली लाच लाचलुचपत प्रतिब...
वेअर हाऊस बाधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक सोनवणे यांनी साडेसात हजार रुपयाची मागितली लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ग्रामसेवकाला लाच स्विकारतांना थाटात घेतले ताब्यात
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा
तालुक्यातील धानोरा येथील तक्रारदार वय.३३ ता.चोपडा जि.जळगाव यांचे पारगांव गावी येथे शेत असुन ग्रामसेवक हेमचंद्र दत्ताञय सोनवणे वय ३९ वर्ष व्यवसाय नोकरी,ग्रामसेवक देवगांव पारगांव रा.चोपडा ता.चोपडा जि.जळगांव यांनी तक्रारदार यांना शेतामध्ये वेअर हाऊस बाधण्याकरिता ग्रामपंचायतीचा परवानगी देण्याच्या मोबदल्यात मागितली साडेसात हजार रुपये लाचेची मागणी केली.सदरची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ३१/०१/२०२४ रोजी शिताफिने सापळा लावुन ताब्यात घेतले असुन पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार यांचे पारगांव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला/बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे साडेसात हजार रुपयांची लाचेची मागणी केली.आज दिनांक ३१/०१/२०२४ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता.चोपडा जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम राञी उशिरापर्यंत सुरु होते.
सदरची कारवाई
सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे,पोशी.राकेश दुसाने,एन.एन.जाधव,पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील,पो.ह.रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ,पो.कॉ.प्रणेश ठाकुर,पोशी अमोल सूर्यवंशी,आदी पथकाने केली.
No comments