चोपड्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेची मासिक मीटिंग शांततेत संपन्न संपादक: हेमकांत गायकवाड दिनांक २९/०१/२०२४ वार सोमवार रोजी ग्राहक पं...
चोपड्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेची मासिक मीटिंग शांततेत संपन्न
संपादक: हेमकांत गायकवाड
दिनांक २९/०१/२०२४ वार सोमवार रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा चोपडा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेचे अध्यक्ष राजू भाई गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मीटिंग आयोजित करण्यात आली होती.त्यावेळेस जिल्हा सचिव उदय कुमार अग्निहोत्री,तालुका चोपडा सचिव भूपेंद्र भाई गुजराती,प्रमोद डोंगरे सर,महेश पोद्दार सर,डॉ.पृथ्वीराज शेंदाणे,नानासाहेब,कैलास महाजन,अनिल बारी सर,विजय पाटील सर,सुधाकर पाटी सर उपस्थित होते.काही सर्वाजनिक प्रश्नावरती चर्चा करण्यात आली.काही ग्राहकांची फसवणूक केली जाते काही ठिकाणी कामाचे मुद्दामहून दिरंगाई केली जाते लोकांवरती ग्राहकावरती अन्याय होत असेल तर तात्काळ कारवाई केली पाहीजे.असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत.तसेच जिल्हासचिव उदय कुमार,अग्निहोत्री सर यांनी ग्रामीण भागात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे ठीक ठिकाणी शाखा उद्घाटन उघडण्याचे आदेश दिले आहेत.मागील प्रश्न उपस्थित करून योग्य निर्णय देखील आले आहेत.आणि जे काही ठराव पास झाले ते सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेचे सचिव भूपेंद्रबाई गुजराती यांनी आभार व्यक्त केले.
No comments