adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण

  ग.स,सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान...

 ग.स,सोसायटी चोपडा शाखेत प्रजासत्ताक दिन साजरा


संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण

संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण


संपादक : हेमकांत गायकवाड 


जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी) विभाग चोपडा शाखेत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन संस्थेचे जेष्ठ सभासद असलमखान सरफराजखान यांचे शुभहस्ते करण्यात आले.संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर तसेच मंगेश भोईटे यांनी संचालक झाल्यापासून चोपडा शाखेचे ध्वजारोहन हे स्वतः न करता ती संधी दोघेही संचालक सभासदांना देत असतात.सभासदांना खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त करुन देण्याच्या सभासद हिताच्या विविध योजना संस्थेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे नेतृत्वात सुरु असून चोपडा येथील संचालकांनी सभासदांचा सन्मानाचा भाग म्हणून चोपडा शाखा अंतर्गत ध्वजारोहन व पात्र सभासदांना मिळणारे सर्व धनादेश देखील आजवर सभासदांच्याच हस्तेच वितरित केलेले आहेत.संस्थेचे स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,गेल्या दिड वर्षापासून ग.स.सोसायटीत खऱ्या अर्थाने संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे  सभासदांची सत्ता आहे.याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सभासदांमधूनच चोपडा उर्दु शाळेतील शिक्षक खान असलमखान सरफराज खान यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सहकार गटाचे नेते व शिक्षक संघटनेचे नेते आर.एच.बाविस्करसर,उर्दू संघटनेचे प्रतिनिधी शेख सय्यद जुनेद तसेच प्रमोद देवरे  व आशिष बडगुजर यांचेसह बहुसंख्य सभासद व कर्मचारी वृंद हजर होते.याप्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे संचालक मंगेश भोईटे यांनी तर स्थानिक संचालक योगेश सनेर यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन उपशाखाधिकारी संजय पाटील यांनी तर आभार उज्वल शिंदे यांनी मानले.

No comments