गांधी विचार संस्कार परीक्षेत सनपुले आश्रमशाळेचे विद्यार्थी चमकले संपादक : हेमकांत गायकवाड जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी...
गांधी विचार संस्कार परीक्षेत सनपुले आश्रमशाळेचे विद्यार्थी चमकले
संपादक : हेमकांत गायकवाड
जळगाव
येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जळगाव जिल्ह्याचा निकाल घोषित झाला असून त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.सदर कार्यक्रम कस्तुरबा सभागृह,गांधीतीर्थ,जैन हिल्स,शिरसोली रोड,जळगाव येथे शनिवार दि.२७ जानेवारी रोजी दुपारी ०१.०० वाजता आयोजित करण्यात आला होता.या स्पर्धेत सनपुले आश्रमशाळेतील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी अर्जुन राजू बारेला व पाचव्या इयत्तेतील कु.सुनीता जगदीश पावरा या दोघांना जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.त्यांना कार्यक्रमादरम्यान बक्षीस वितरित करण्यात आले.यावेळी उपस्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य नीलकंठ गायकवाड व राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. के.पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.या अगोदर इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर गांधी विचार संस्कार परीक्षेचे संदर्भातील पुस्तकांचे वाचन केले. त्यावर आधारित परीक्षा दिली व जिल्हाभरातून आयोजित या स्पर्धेत दोघेही विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकाविला.या परीक्षे दरम्यान विद्यालयातील उपशिक्षक मिलिंद तुळशीराम पाटील व नरेंद्र अभिमन पवार यांनी परीक्षा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी
इतर शिक्षकांनी देखील सहकार्य केले.दोघांना जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळाला आणि शाळेचे नावलौकिक विद्यार्थ्यांमुळे झाल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील तथा प्राथमिक मुख्याध्यापक सी.डी.पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक एन.एम.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
No comments