छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त २१ रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभा तालुका स्तरावर प्रथमच प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजा सिंह यांची सभा ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त २१ रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभा
तालुका स्तरावर प्रथमच प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजा सिंह यांची सभा
पत्रकार परिषदेत आयोजकांनडुन मिळाली माहिती
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता,बंधुता आणि न्याय मिळेल,असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग,सच्चर आयोग,अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे;मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही.मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्या शाळांना सरकारी अनुदान,तर हिंदूंना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे ! देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण,तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ?अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’.भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता कोर्टाजवळील खान्देश प्रेस मैदान येथे ‘विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे,तालुका स्तरावर पहिल्यांदा टायगर राजा सिंह चोपडा तालुक्यात सभा होणार असल्याची माहिती सभेच्या आयोजकांनी दिली.हॉटेल श्रीनाथ प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.या सभेत प्रमुख वक्ता म्हणून तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजा सिंह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे,तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव,हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर आणि रणरागिणी कु.प्रतीक्षा कोरगावकर हे संबोधित करतील.या वेळी सर्वश्री अनिल वानखेडे,अमृत सचदेव,राजाराम पाटील,गजेंद्र जैस्वाल,नरेश पाटील,प्रवीण जैन,नरेश महाजन,मनीष गुजराथी,राजू स्वामी,यशवंत चौधरी,प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथे आयोजित या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक,क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक,यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती,साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
No comments