*महाराष्ट्र कोळी समाज संघ मध्ये महिलांनी सहभागी व्हा... रोहिणीताई इंगळे* महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई इंगळे कोळी जमातीतील महिलांना एकत्...
*महाराष्ट्र कोळी समाज संघ मध्ये महिलांनी सहभागी व्हा... रोहिणीताई इंगळे*
![]() |
महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई इंगळे |
कोळी जमातीतील महिलांना एकत्रित करून महिलांना स्वावलंबी बनवून महिला सक्षमीकरणाला चालना देऊन जमाती मधील महिलांना विविध योजनांची माहिती,रोजगार उपलब्ध व्हावा तसेच महिलांना पुरूषाइतकाच सन्मान मिळावा
विशेष प्रतिनिधी अमोल बावस्कार
संपादक : हेमकांत गायकवाड
मलकापूर:-
आदिवासी कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी व जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात आदिवासी कोळी जमात बांधवांना सोबत घेऊन लढण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र कोळी समाज संघ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी कोळी जमातीच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आपण महिला युवा वर्गाणी लढा देण्यासाठी फक्त आणी फक्त कोळी जमातीसाठी एकत्र येण्यासाठी आपल्या कोळी जमात मध्ये महिला सशक्तीकरण जनजागृती करून कोळी जमातीतील महिलांना एकत्रित करून महिलांना स्वावलंबी बनवून महिला सक्षमीकरणाला चालना देऊन जमाती मधील महिलांना विविध योजनांची माहिती,रोजगार उपलब्ध व्हावा तसेच महिलांना पुरूषाइतकाच सन्मान मिळावा या विचारतेने महिलांनी सहभागी व्हावे असे महाराष्ट्र कोळी समाज संघ युवा महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई इंगळे यांनी आव्हान केले.
No comments