Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील एकूण 11ग्रामपंचायतींचे महिला पदांसाठी चे आरक्षण काढण्यात आले

  चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील एकूण 11ग्रामपंचायतींचे महिला पदांसाठी चे आरक्षण काढण्यात आले  अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्य...

 चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील एकूण 11ग्रामपंचायतींचे महिला पदांसाठी चे आरक्षण काढण्यात आले 

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जमातीकरीता राखीव असलेल्या सरपंच पदापैकी १/२ पदे ही सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता आरक्षित 



संपादक : हेमकांत गायकवाड 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जमातीकरीता राखीव असलेल्या सरपंच पदापैकी १/२ पदे ही सन  2024 ते 2029 या कालावधीसाठी अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता आरक्षित करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर श्री महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11:00 वाजता सभा आयोजित करण्यात आली

प्रस्तुत सभेस चोपडा तालुक्यातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते मा.उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आजच्या सभेचे आयोजन करण्याचे प्रयोजन सांगितले त्यानुसार चोपडा तालुक्यातील एकूण 11ग्रामपंचायतीचे अनुसूचित क्षेत्रातील आहेत वैजापूर, कर्जाणे,मोहरद, उमर्टी देव्हारी , मेलाणे,बोरअजंटी, सत्रासेन, मोरचिडा, विष्णापुर, कृष्णापुर हि गाव असून तर सन 2018 ते 2023 या कालावधीत एकूण 11ग्रामपंचायतीपैकी 6ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आले होते ते गाव कर्जाणे,मोहरद, मेलाणे, बोरअजंटी, कृष्णापुर, देव्हारी या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले होते सदर आरक्षण सन 2018ते2023 या कालावधीत असल्याने आता या ग्रामपंचायती वगळून नव्याने सरपंच पदाचे आरक्षण काढणे आवश्यक असल्याचे मा.उपविभागीय अधिकारी यांनी नागरिकांना सांगितले 

चोपडा तालुक्यातील एकूण 11ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रातील असून त्यापैकी 6 ग्रामपंचायतींच्या महिलांसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याबाबत उपस्थितांना समज दिली सन 2018 ते2023या कालावधीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती वगळून शिल्लक राहिलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे असल्याचे नमूद केले वैजापूर, सत्रासेन, उमर्टी,मोरचिडा विष्णापुर अशा एकूण 5 ग्रामपंचायती सन 2024 ते 2029 या कालावधी करीता महिलांसाठी आरक्षित करण्यात येत असल्याबाबत नमूद केले तथापि चोपडा तालुक्यात एकूण 6 ग्रामपंचायतीं महिलां आरक्षित करावयाच्या असल्याने याकामी कर्जाणे , मोहरद, मेलाणे, बोरअजंटी, कृष्णापुर, देव्हारी या सन 2018 ते 2023 या कालावधीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती मधून 1चिठ्ठी टाकणे आवश्यक असल्याचे मा.महोदय यांनी नमूद केले उक्त ग्रामपंचायती मधून कृष्णापुर या एका ग्रामपंचायतीची चिठ्ठी कु. भावेश ज्ञानेश्वर भोई वय 09 वर्षे रा. पाटील गडी , चोपडा ह्यांच्या हस्ते उचलण्यात आली त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी महिला सरपंच पदासाठी वैजापूर, सत्रासेन, उमर्टी, मोरचिडा, विष्णापुर, कृष्णापुर ह्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आणि उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले प्रस्तुत सभेत तहसीलदार चोपडा श्री भाऊसाहेब थोरात तसेच तहसील कार्यालय चोपडा येथिल ग्रामपंचायत शाखेतील कर्मचारी उपस्थित होते

No comments