ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या दिनदर्शिकेचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते प्रकाशन ग्राहक पंचायतयतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात ...
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या दिनदर्शिकेचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते प्रकाशन
ग्राहक पंचायतयतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात सुरू करणे बाबतच्या संकल्पनेला तहसीलदार यांनी प्रोत्साहन दिले
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी अशासकीय सदस्य तथा जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री,तालकाध्यक्ष राजेश आर गुजराथी,डाॅ.पृथ्वीराज सैंदाणें,अनिल बारी,सह पुरवठा शाखेचे अधिकारी दत्तञय नेतकर,ग्राहक पंचायतयतीचे ईतर पदाधिकारी सह अनेक जण उपस्थित होते.ग्राहक पंचायतयतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात सुरू करणे बाबतच्या संकल्पनेला तहसीलदार यांनी प्रोत्साहन दिले.व चौगांव येथील प्रस्तावित दिनांक 09/02/2024 रोजी ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या उद्धघाटनाचे निमंत्रणही स्वीकारले आहे.त्या नंतर चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मधुकर साळवे व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर,एस टी आगारप्रमुख,गट विकास अधिकारी ,तालुका आरोग्य अधिकारी,वगैरे शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयात दिनदर्शिकेच्या प्रती देण्यात आल्यात. या शासन भेटीच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती देऊन " ग्राहक पंचायत महाराष्ट्र घरोघरी " हे अभियान यशस्वी केले.
No comments