भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान मोहिमेची कार्यशाळा व शहर व ग्रामीण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सत्कार समारंभ संपन्न चोपडा प्रतिनिधी ...
भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान मोहिमेची कार्यशाळा व शहर व ग्रामीण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सत्कार समारंभ संपन्न
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
भारत माता यांचे प्रतिमा पूजन करुन, छत्रपती शिवाजी महाराज व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण चोपडा मंडलच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले,विविध आघाडी सेल,युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास तालुक्यातील जेष्ठ नेते युवराज शहा व तिलक शाह विशेष आमंत्रित होते.या वेळी चंद्रशेखर पाटील (भाजप तालुकाध्यक्ष ग्रामीण) यांनी सर्व प्रथम मनोगत व्यक्त केले.गाव चलो अभियान संदर्भात विविध माहीती देऊन प्रवासी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच जेष्ठ नेते आत्माराम माळके यांनी कार्यकर्ते यांना विजयाचा मंत्र दिला.हिरा चौधरी हे चोपडा तालुका निरीक्षक म्हणून उपस्थित होते.त्यांच्यासोबत हर्षल पाटील (प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा)विलास चौधरी(विस्तारक रावेर लोकसभा)उज्जैन राजपूत (तालुका सरचिटणीस यावल) उपस्थित होते.हिरा चौधरी व हर्षल पाटील यांनी गाव चलो अभियान या योजने अंतर्गत उपस्थित प्रवासी कार्यकर्त्यांना विस्तृत माहीती व मार्गदर्शन केले.गोविंदराव रतन सैंदाणे साहेब (चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख)चंद्रशेखर युवराज पाटील (चोपडा मंडळ अध्यक्ष ग्रामीण)
नरेंद्र पाटील (शहराध्यक्ष चोपडा)
यांच्यासह जिल्हा पदाधिकारी तसेंच भारतीय जनता पार्टी तालुका व शहर पदाधिकारी,युवा मोर्चा शहर व ग्रामीण विविध आघाडी सेल,सर्व सुपर वॉरियर सर्व बूथ प्रमुख निवासी/प्रवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments