डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पहिले शेतकरी प्रशिक्षण चोपडा तालुक्यातील खेड्या गावात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ...
डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पहिले शेतकरी प्रशिक्षण
चोपडा तालुक्यातील खेड्या गावात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आज दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी गावपातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण वर्ग
चोपडा प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील खेड्या गावात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आज दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी गावपातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण वर्गात नरेंद्र जाधव,मंडळ कृषी अधिकारी, हातेड यांनी चहार्डी व धुपे खु|| गावातील शेतकरी गटांना योजना विस्तृतपणे समजून सांगितली व शेतकरी गटांना सेंद्रिय शेती प्रमाणीकरण प्रक्रियेतील टप्पांविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिवामृत तयार करण्याविषयी लागणाऱ्या निविष्ठांची मांडणी प्रशिक्षण वर्गात करण्यात आली होती,त्यांची ओळख व त्यांचे महत्त्व याची माहिती विलास मोरे,कृषि सहाय्यक,हातेड खु|| यांनी दिली.जिवामृताचे मातीच्या पोषणमुल्यांमधील महत्वाविषयी मार्गदर्शन जितेंद्र पाटील कृषि सहायक,चहार्डी यांनी केले.प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी राहुल साळुंखे,कृषि सहाय्यक,घोडगाव व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शमहेंद्र साळुंखे यांचे अनमोल सहकार्य केले.

No comments