क्रीडा सह्याद्री निफाडचा खेळाडूं दक्ष गायकवाड याची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड. स्पर्धेमध्ये निफाड क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू...
क्रीडा सह्याद्री निफाडचा खेळाडूं दक्ष गायकवाड याची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.
स्पर्धेमध्ये निफाड क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू दक्ष गायकवाड यांची नाशिक संघामध्ये एसटी रक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
नाशिक प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
चौदा वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत निफाड येथील क्रीडा सह्याद्री मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले,टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत निफाड येथील क्रीडा सह्याद्री चा खेळाडू दक्ष विनोद गायकवाड याची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, विलास गिरी व क्रीडा शिक्षिका योगिता महाजन व प्रतिक्षा कोटकर आदी उपस्थित होते पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट
स्पर्धेमध्ये निफाड क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू दक्ष गायकवाड यांची
नाशिक संघामध्ये एसटी रक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
दक्ष यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट च्या सचिव मिनाक्षी गिरी, जिल्हा सचिव विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री सदस्य चेतन कुंदे,रमेश वडघुले, पत्रकार विनोद गायकवाड, पत्रकार राहुल कुलकर्णी, भूषण निकम, विजय घोटेकर ,लखन घडमाले यानी सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments