आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाधी आंदोलन या पुढिल आंदोलने चिघळण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी विभाग प्रमुख अमोल बावस्कार मलक...
आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाधी आंदोलन
या पुढिल आंदोलने चिघळण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी
विभाग प्रमुख अमोल बावस्कार
मलकापूर:- जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभ रित्या निर्गमित करण्यासाठी २९ दिवसापासुन एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण चालू असुन जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी रेटुन धरलेल्या जाचक मुद्द्याचे प्रत्येक गावात पडसाद उमटत आज बोरखेड,भोकर,नरवेल, म्हैसवाडी येथे संदीप सपकाळ , कृष्णा दिनकरधाडे , लहु धाडे, कृष्णा निवृत्ती धाडे यांच्या वतीने समाधी आंदोलन करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की आदिवासी कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र शासन - प्रशासन स्तरावरून सुलभरित्या निर्गमित होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने २९ दिवसापासुन गणेश इंगळे ,गजानन धाडे ,संदीप सपकाळ यांनी एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण चालू ठेवले असुन या उपोषण कालावधीत जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यासोबत कोळी महादेव जमातीच्या शिष्टमंडळाने दोन ते तीन वेळा चर्चा केली मात्र जिल्हाधिकारी यांनी १९५० च्या पुराव्याचे नोंदीं कोळी महादेव असाव्यात अशा प्रकारच्या जाचक अटी चा मुद्दा रेटुन धरून प्रमाणपत्र नाकारल्याने तसेच प्रांत अधिकारी यांचे कर्तव्य आहे की त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना तात्काळ जात प्रमाणपत्र देणे गरजेचे असून ते जात पडताळणी समितीने ग्राह्य धरणे किंवा फेटाळणे हा विषय पडताळणी समितीचा आहे मात्र प्रांत अधिकारी हे नेहमीच उडबावडीचे उत्तरे देऊन आदिवासी कोळी महादेव अनुसूचित जमातीची दिशाभूल करत असल्याचा कोळी महादेव जमातीचा आरोप असून बुलढाणा जिल्ह्यातील तमाम कोळी महादेव जमात बांधवांचा याविषयी तीव्र भावना निर्माण होत संताप व्यक्त करत नरवेल, म्हैसवाडी येथे केलेल्या समाधी आंदोलनातुन दिसुन आले आहे तसेच या समाधी आंदोलनामुळे पोलीस प्रशास,महसुल विभागाची चांगलीच तारांबळ उडाली असुन दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोनि हेमराज कोळी ,महसूल विभागाचे नायब तहसीलदार उगले, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कोशल महाजन ,सतीश वैदकर, पोलीस पाटील योगेश पाटील घटनास्थळी दाखल होऊन आंदोलन कर्त्याच्या समस्या मागण्या ऐकून घेऊन आजच वरती अहवाल पाठवण्याचे मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी यापुढे या शासन प्रशासनाने या आंदोलनाची , मागण्यांची दखल न घेतल्यास समाधी आंदोलनच नाही तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अश्या प्रकारचा इशारा कोळी महादेव जमातीच्या वतीने दिला असून या होणाऱ्या परिणामाला शासन, प्रशासन च जबाबदार राहणार असल्याचे नारे देत सांगण्या आले आहे यावेळी या आंदोलनामध्ये विश्वनाथ पुरकर , काँग्रेस कार्यकर्ते गिरीश कोलते , . शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सोपान शेलकर ,गणेश सुरडकर , कृष्णा झालटे, गोपाल लोणे .गोपाल धाडे, अमोल धाडे, अमोल कहाते विकास धाडे, नारायण तायडे ,गजानन धाडे ,रामा पिवळतकार ,शत्रुघ्न भोलणकर, सचिन भोलनकर.भागवत घाईट ,विश्वनाथ इंगळे ,अरुण कांडेलकर,निना शिरसाट ,तसेच पंचक्रोशीतील आदिवासी कोळी महादेव जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



No comments