Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाहिजे असलेला व फरार आरोपीतास अटक करून त्यांच्या कडून मोटार सायकल चोरीचे पाच व घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून त्यास मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

  पाहिजे असलेला व फरार आरोपीतास अटक करून त्यांच्या कडून मोटार सायकल चोरीचे पाच व घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून त्यास मुद्देमालासह अटक करण्यात...

 पाहिजे असलेला व फरार आरोपीतास अटक करून त्यांच्या कडून मोटार सायकल चोरीचे पाच व घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून त्यास मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश 




संपादक :- हेमकांत गायकवाड

जळगाव जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपितांचे शोध घेण्याकामी मा. श्री डॉ.महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव मा.श्री अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांनी श्री किसन नजनपाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करण्याबाबत मार्गदर्शन सुचना निर्गमित केल्या होत्या त्याप्रमाणे श्री किसन नजनपाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस अंमलदार पो हे कॉ/ कमलाकर बागुल,पोहेकॉ /संदिप पाटील, पोहेकॉ/ प्रविण मांडोळे, पोहेकॉ/ गोरख बागुल ,पोहेकॉ/ अनिल देशमुख ,पोहेकॉ/ संदिप सावळे ,पोना/ईश्वर पाटील, चालक पोहेकॉ/महेश सोमवंशी, पोकॉ/ लोकेश माळी असे पथक तयार करून त्यांना जळगाव जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेणे कामी मार्गदर्शन केले होते

     


 

सदर पथकाने चोपडा शहरात गोपनीय माहिती काढून चोपडा शहर पोलिस स्टेशन गु.र.नं.४४/२०१७ भा.द.वी.कलम ३७९ मधील पाहिजे असलेला आरोपी सुरेश राजाराम बारेला वय २५ रा.देवली-दुगानी ता‌. वरला जी.बडवानी ह.मु.सुंदरगढी चोपडा ता.चोपडा यास चोपडा शहरात महात्मा गांधी काॅलेज रोडवर शांती वाईन शॉप जवळ सापळा रचून त्यास जागीच पकडले त्याच्या ताब्यात होन्डा कंपनीची युनिक्रॉन मो.सायकल क्रं.MP 46 MT 3272 ही मिळून आली त्या बाबत त्यास विचारपूस करता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने सदर मोटार सायकल बाबत माहिती घेतली असता सदरील मोटार सायकलचा रजि.क्रं.MH 19 BR 7061असा मिळून आला  त्यावरून त्यास अधिक विचारपूस करता त्याने सदरील मोटार सायकल भोकणी ता.धरणगांव जि जळगाव येथून चोरी केलेली आहे बाबत सांगितले त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने जळगाव शहरातुन 3 मोटार सायकल अमळनेर शहरातून 1 मो‌.सा.तसेच चोपडा शहरात व शिरपूर शहरात घरफोडी केल्याचे सांगितले त्याप्रमाणे आरोपी सुरेश बारेला याचे कडून एकूण १,४८,३७०/- रुपयाचा मुद्देमाल त्यात ३ मोटार सायकल व घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी सुरेश बारेला वय २५ रा.देवली-दुगानी ता.वरला जी बडवानी (मध्यप्रदेश) ह .मु.सुंदरगढी चोपडा ता.चोपडा जि जळगाव याने खालील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे

१) जळगाव तालूका पोलिस स्टेशन गु.र.नं.५६/२०२४  भा.द.वी.३७९

२) जळगाव तालूका पोलिस स्टेशन गु.र.नं.४२/२०२४ भा.द.वी.३७९

३) जळगाव तालूका पोलिस स्टेशन गु.र.नं.४३ /भा.द.वी.३७९

४) धरणगाव पोलिस स्टेशन गु.र.नं.७९/२०२४भा द वी ३७९

५) अमळनेर पोलिस स्टेशन गु.र.नं.५७९/२०२४भा.द.वी ३७९ 

६) चोपडा पोलिस स्टेशन गु.र.नं.३५/२०२४ भा.द.वी.४५७,३८०,४२७

७) शिरपूर पोलिस स्टेशन येथे भाग ५ गु.र.नं.६२२/२०२३ भा.द.वी.४५४,४५७,३८०

नमूद आरोपी यास पुढील कारवाईकामी जळगाव तालूका पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे

No comments