धुळे जिल्ह्यातील महिला व पुरुष कामगारांना रात्री मुक्काम न ठेवता एकाच दिवसात वेळेवर भांडे द्या,अभिलाल दादा देवरे धुळे प्रतिनिधी संपादक: हे...
धुळे जिल्ह्यातील महिला व पुरुष कामगारांना रात्री मुक्काम न ठेवता एकाच दिवसात वेळेवर भांडे द्या,अभिलाल दादा देवरे
धुळे प्रतिनिधी
संपादक: हेमकांत गायकवाड
धुळे :-
जिल्ह्यातील कामगारांना कामगार महामंडळाकडून कुंडाणे ता.जि.धुळे येथे भांडे मिळत आहेत, पर्यंतु त्या ठिकाणी महिला व पुरुष कामगारांना पिण्यासाठी पाणी नाही, सावली नाही, दोन दिवस नंबरवर उभे राहावे लागते, रात्री मुक्कामाची व्यवस्था नाही, ठेकेदार व कामगार महामंडळाकडून महिला व पुरुष कामगारांवर अन्याय होत आहे, अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया 88 88 94 62 54 यांच्याकडून जिल्हाधिकारी गोयल साहेब, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे साहेब, नायक तहसीलदार संजय पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देण्यात आले. कामगार महामंडळाने जिल्हास्तरीय भांडे न वाटता, ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरीय भांडे वाटप करावे. अभिलाल दादा देवरे, कामगारांसाठी पाणी व सावलीची व्यवस्था करावी, कर्मचारी वाढवून एकाच दिवसात भांडे द्यावे, तसे नाही झाल्यास टोकन देऊन तारीख द्यावी, पण महिलांना रात्री मुक्कामी ठेवू नये, जर कुणाचे बरेवाईट झाल्यास याला सर्वस्व जबाबदार ठेकेदार व प्रशासन तसेच लोक प्रतिनिधी राहतील याची नोंद घ्यावी.
No comments