शेतकर्यांच्या हाकेला डॉ.चंद्रकांत बारेला यांची साथ. शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली अ...
शेतकर्यांच्या हाकेला डॉ.चंद्रकांत बारेला यांची साथ.
शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली अडावद येथे वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
प्रतिनिधी चोपडा
संपादक: हेमकांत गायकवाड
वीज प्रश्नी संतप्त झालेल्या खर्डी, वटार ,अडावद परिसरातील 100 ते 150 शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली अडावद येथे वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वीज कंपनीने कृषी पंपासाठी पूर्ण क्षमतेने व अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा, यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे नेतृत्व करत डॉ.चंद्रकांत बारेला यांनी संबंधित अधिकारी यांना धारेवर धरत जागच्या जागी अर्धा तासात सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा सरचिटणीस सचिन मच्छिंद्र डाभे, दर्शन राजपूत सह परिसरातील शेतकरी बांधव व मित्र परिवार उपस्थित होते.

No comments