चोपड्यात बौद्ध महासभेने केली रमाई जयंती उत्साहात साजरी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा तालुक्याच्य...
चोपड्यात बौद्ध महासभेने केली रमाई जयंती उत्साहात साजरी
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती दीनदलितांची माता रमाबाई भिमराव आंबेडकर तथा रमाई जयंती साजरी
चोपडा प्रतिनिधी
संपादक : हेमकांत गायकवाड
चोपडा येथे दि ७फेब्रुवारी २०२४ रोजी दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती दीनदलितांची माता रमाबाई भिमराव आंबेडकर तथा रमाई जयंती साजरी करण्यात आली यावेळी आयु.बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यांत आला.रमाई जयंती दिना निमित्त विद्यार्थीनी व काही मान्यवरांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मनोगत केले.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार महिला व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रमाई च्या जीवनावर उत्कृष्ट भाषण व गीतगायन तसेच उत्कृष्ट नृत्य सादर केल्या बद्ल करीना विजय शंभरकर,लुम्बिनी प्रविण करनकाळ,श्रृती राहूल ढिवरे,भाविका विलास भालेराव इतर १० विद्यार्थीना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व प्रास्तविक सुकदेव बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अशोक बाविस्कर(जिल्हा उपाध्यक्ष वंचित तथा नगरसेवक चोपडा)रमेश शिंदे(माजी नगरसेवक)संतोष अहिरे(सामाजिक कार्यकर्ता चोपडा)हितेंद्र मोरे माजी मुख्याध्यापक तथा जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा,कैलास सोनवणे(माजी.नगसेवक),समाधान सपकाळे,जानकीराम सपकाळे,सुदाम ईशी,मिलिंद सोनवणे,दिवाणजी साळुंखे,हेमकांत गायकवाड,छोटू वारडे,प्रविण करनकाळ,व महिला भगिनी,बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,बौद्ध समाज बांधव यांनी प्रयत्न केले.


No comments