एनटी व ओबीसींना घरकुल यादीतून डावले अभिलाल दादा देवरे, ते जर पेटून उठले तर तुम्हाला महागात पडेल केंद्र व राज्य शासनाला इशारा. प्रतिनिधी ध...
एनटी व ओबीसींना घरकुल यादीतून डावले अभिलाल दादा देवरे, ते जर पेटून उठले तर तुम्हाला महागात पडेल केंद्र व राज्य शासनाला इशारा.
प्रतिनिधी धुळे
संपादक: हेमकांत गायकवाड
एनटी व ओबीसींना घरकुल यादीतून डावले ते जर पेटून उठले तर तुम्हाला महागात पडेल केंद्र व राज्य शासनाला इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे 88 88 94 62 54 देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी वचन दिले होते. 2022 पर्यंत प्रत्येक गोरगरिबांना पक्के घर, ( बेघर ) मिळेल. परंतु आज दहा वर्षापासून मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत एवढेच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामपंचायत पासून तर राज्य आणि केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, आणि सत्तेचा माज असलेले लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांचे बेघर मध्ये नाव आलेले डिलीट करून गरिबांना घरापासून वंचित ठेवले आहे, आपली सत्ता येण्यासाठी मोदी साहेबांनी जनतेला खोटे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल केली अभिलाल दादा देवरे, धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन चार वर्षापासून मी सातत्याने ग्रामपंचायत पासून पंचायत समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे, गोरगरिबांचे नाव घरकुलच्या लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा कॉम्प्युटर मध्ये डिलीट केले जाते हे राजकीय षडयंत्र आहे. तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आमच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही. ज्याला राहण्यासाठी घर नाही, जे गरीब झोपडी मध्ये राहतात, ज्या मुलांना आई-वडील नाहीत, ज्या महिलांचे पती नाहीत, जे मजुरी करून पोट बरतात त्यांनाच घरकुल पासून वंचित ठेवले, घरकुल कोणाला दिले जाते, ज्याचा मोठा वशिला जो या लोकप्रतिनिधींचे चपला उचलतात त्याच लोकांना घरकुल दिले जाते असे अभिलाल दादा देवरे सांगतात. 2023 मध्ये ओबीसींना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल मिळेल अशी आशा लावून सर्व एनटी व ओबीसींना कागदपत्रे काढण्यासाठी खर्च करायला लावला, तसेच घरपट्टी वसुली केली आणि एनटी कॅटेगिरी चे ओबीसीमध्ये असून सुध्दा फॉर्म जमा केले नाहीत. असा अन्याय एनटी व ओबीसींवर केला जात आहे, आमच्या मुलांना नोकरी नाही, आमच्या लोकांना काम धंदा नाही, आमच्या शेतकरी बांधवांच्या मालाला भाव नाही, आमच्या गोरगरिबांना घरकुल नाही, आम्हाला सरळ सत्ताधाऱ्यांनी खोटे आश्वासन दिले आहे, तर येणारा 2024 मध्ये आमची गोरगरीब जनता आपली लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी.

No comments