११ ग्रामपंचायतींच्या सन २०२४ ते २०२९या कालावधीसाठी चे तालुक्यातील पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे पुर्ण...
११ ग्रामपंचायतींच्या सन २०२४ ते २०२९या कालावधीसाठी चे तालुक्यातील पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षित
प्रतिनिधी चोपडा
संपादक : हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील सर्व ११ ग्रामपंचायतींचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य तसेच सर्व नागरिकांना कळविण्यात येते की मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेश क्र.साशा/ग्रामपं/करावी/१२/२२ दि.४/१/२०२४ अन्वये चोपडा तालुक्यातील खालील नमूद केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील ११ ग्रामपंचायतींच्या सन २०२४ ते २०२९ या कालावधीसाठीचे तालुक्यातील पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षित करणे आवश्यक आहे त्यासाठी तालुका निहाय सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना पत्राद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे त्यासाठी पुर्णतः अनुसूचित क्षेत्रातील महिलांसाठी आरक्षित निश्चित करण्यासाठी मा.उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांचे अध्यक्षतेखाली खाली दि २०/०२/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता सोडत सभा हि नवीन प्रशासकीय इमारत, जुना शिरपूर रोड , ग्रामीण पोलीस स्टेशन समोर चोपडा जी जळगाव येथे आयोजित केली आहे
तर दिनांक २०/२/२०२४ रोजी वैजापूर,कर्जाणे,मोहरद,उमर्टी,देव्हारी,मेलाणे ,
बोरअजंटी ,सत्रासेन,मोरचिडा, विष्णापुर, कृष्णापुर ,या गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे
No comments